सातपूर मध्ये गेल्या दोन आठवड्यापासून अनियमित वीजपुरवठा तसेच दोन ते तीन तास रोज वीजपुरवठा खंडित होत असल्याकारणाने उद्योजक त्रस्त झाले आहे खासकरून  C -११ नाईस , सातपूर येथील उद्योजकांना याचा फटका बसत आहे व आर्थिक नुकसान होत आहे . यासंदर्भात म. रा. वि .म . चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदनवार साहेब यांना निमा पावर समितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे यांनी C -११ येथे समक्ष नेउन सर्व उद्योजकांकडून समस्या समजावून घेतली व त्यावर नंदनवार साहेब यांनी  जे त्वरित शक्य आहे ते लगेच करतो  परंतु ट्रान्सफॉरमर व डी बी  बदलावयाचे असल्यामुळे त त्याचे काम दर शनिवारी करण्याचे आदेश दिले असे सांगितले . तेथील उद्योजक रोजच्या होणाऱ्या नुकसानीमुळे त्रस्त आहे तसेच यामुळे जी अपरिमित हानी होत आहे त्याबद्दल संताप देखिल व्यक्त केला . यावेळी निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी हि बैठक घडवून आणली व या समस्येमध्ये जातीने लक्ष देऊन याचा वेळीवेळी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले . यावेळी निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर ,पावर समितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे  तसेच सतीश पगार , अंबादास चौरे , मिलिंद कुलकर्णी ,मोहन शेरूगर , धनंजय राव , कैलास पाटील, नितीन तोडवल हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *