मविप्र समाजाचे समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त “सामाजिक आव्हाने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका” या विषयावर एक दिवसीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राज्य कार्याध्यक्ष व राष्ट्रीय फिरा चे उपाध्यक्ष मा. श्री. अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना,शासकीय व अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.


अविनाश पाटील यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातील तीन दशकांच्या प्रवासातील अनुभवाचे वेबिनार मध्ये मांडणी करत असताना त्यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक, अंधश्रद्धेचे पैलू, अंधश्रद्धेचे प्रकार, अंधश्रद्धेचे वर्गीकरण, अंधश्रद्धेच्या विविध समुदाय यांवरील प्रभाव सांगत असताना राष्ट्र विकासावर टप्प्या टप्प्याने होणारे परिणाम उदाहरणासह विद्यार्थ्यांसमोर मांडल.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विविध कार्यकर्त्यांचे बलिदान व कार्य महाराष्ट्रातील समाजकारणात ठळकपणे नोंद घेण्यासारखे असून इतक्या बहुपदरी व बहुआयामी कामाने आपला ठसा जनमानसात उमटवलेल्या या कार्यकर्त्यांचे कार्य धोरणात्मक नसून कृती कार्यक्रम करणारे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रचार-प्रसार ,जनजागृती करणारे होते हे त्यांनी सांगितले

अंधश्रद्धा मानवी विकासातील अडथळा असून समाजातील प्रत्येक घटकाने वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी समाज कार्यकर्त्यांच्या अंगी विविध ज्ञान, कौशल्य व गुण असणे गरजेचे आहे हे सांगून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्य हे व्यक्तीच्या ,समुदायाच्या, समाजाच्या मानसिकतेचे वर्तनावर मार्गदर्शन करणारे असावे हा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना, संस्था प्रतिनिधींना दिला दिला.
सदर कार्यशाळेसाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनिता जगताप डॉ. मनीषा शुक्ल व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी कार्यशाळा प्रसंगी उपस्थित होते. कार्यशाळेसाठी गणेश ऊफाडे व प्रविण भालेकर या विद्यार्थीनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *