सिडको नवे नाशिक , प्रभाग क्र २४ येथील महाराणा प्रताप चौक उद्यानात नगरसेवक प्रविण (बंटी ) तिदमे यांच्या नगरसेवक निधीतून उभारलेल्या ग्रीनजीमचे उदघाटन व लोकार्पण समारंभ पुर्वक करण्यात आले . जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला .आरोग्यसंपन्न प्रभाग हा कार्यमंत्र केंद्रस्थानी ठेवून नगरसेवक तिदमे यांनी प्रभागात सर्वत्र सर्व वयोगटातील नागरिकांसाठी व्यायामासाठी
ग्रीन जीम व विविध प्रकारच्या खेळणी , उपकरणे उभारण्याची मोहीमच सुरू केली आहे . प्रारंभी नगरसेवक तिदमे यांनी स्वागत करून बलोपासनेद्वारे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी सतत प्रयत्न करण्याचे आवाहन केले .
या कार्यक्रमास बालगोपाल , युवक युवती , माता भगिनी व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते .
या प्रसंगी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे, रविभाऊ सोनजे,नंदकुमार दुसाने,गीते टेलर, जय शर्मा, सुनील सोनवणे, पंकज भांबर, विवेक चौधरी, मुन्ना पटेल, स्वप्निल पांगरे, श्रीपाद काजळे, केतन जोशी, प्रविण कापडे, कारभारी भागवत, अभिजित सोनजे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *