नाशिकच्या उद्योजकांना व्यापार उद्योग वाढीसाठी ग्रीसला येण्याचे आवाहन – भारतीय राजदूत शामा जैन

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर,  आयमा, निमा,यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ३० मे २०१९ रोजी दुपारी २ वाजता आयमा हाऊस, एमआयडीसी, अंबड येथे आयोजित सेमिनारमध्ये ग्रीस येथील भारतीय राजदूत शामा जैन यांनी नवीन तंत्रज्ञान, ऊर्जा, फूड अँण्ड अग्रिकल्चर, लॉजिस्टिकस अँण्ड टूरिझम यांसह ग्रीसमध्ये असलेल्या व्यापार-उद्योग वाढीच्या विविध संधी याबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.ग्रीस आणि भारताचे सम्बन्ध चांगले आहे युरोपियन देशांची भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे भारतीय उद्योजकांना परदेशात व्यापार उद्योग वाढविण्याची मोठी संधी आहे.  तसेच व्यापारी उद्योजकांना ग्रीसमध्ये असलेल्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय राजदूत शामा जैन, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा,  आयमाचे अध्यक्ष श्री. वरून तलवार, जनरल सेक्रेटरी श्री. ललित बुब,माजी अध्यक्ष सल्लगार समितीचे चेअरमन श्री. धनंजय बेळे  निमाचे अध्यक्ष श्री. हरिशंकर बॅनर्जी, जनरल सेक्रेटरी श्री. तुषार चव्हाण उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबर तर्फे व्यापार उद्योग देश परदेशात वाढवा यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत असल्याचे सांगितले तसेच . परदेशांत शिष्टमंडळ घेऊन जातो तेथील नवनवीन तंत्रज्ञान, विविध क्षेत्रात असलेल्या संधी याची सविस्तर माहिती व्यापारी उद्योजकांना देतो व परदेशात उद्योग उभारण्यासाठी व वाढविण्यासाठी चेंबरतर्फे संपूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले. ग्रीसमध्ये भारतातून महाराष्ट्र चेंबर चे शिष्टमंडळ गेले होते त्यावेळी  भारतीय राजदूत शामा जैन यांनी अतिशय चांगली मदत केली होती. त्यावेळी जैन यांनी नाशिकला येण्याचे मान्य केले होते आणि त्या आज आल्या आणि शब्द पूर्ण केला.    सुरवातीला  आयमाचे अध्यक्ष श्री. वरून तलवार यांनी स्वागत करून कार्यक्रमाची माहिती दिली.  माजी अध्यक्ष सल्लगार समितीचे चेअरमन श्री. धनंजय बेळे यांनी नाशिकच्या व्यापारी-उद्योजकांना उद्योग वाढीसाठी परदेशात अनेक संधी आहेत त्याची माहिती आपणाला या सेमिनारच्या माध्यमातून मिळणार आहे. सर्वानी संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
सूत्रसंचालन महाराष्ट्र चेंबरच्या सचिव विनी दत्ता यांनी केले तर आभारप्रदर्शन निमाचे  जनरल सेक्रेटरी श्री. तुषार चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमास सौ. सुनीता फाल्गुने, डॉ . मिथिला कापडणीस, स्वप्नील जैन, प्रशांत जोशी, भावेश मानेक , अंजु सिंघल, सी एस सिंग, आशिष नहार, अविनाश मराठे, सुदर्शन डोंगरे, राधाकृष्ण नाईकवाडे, उदय रकिबे, राहुल गांगुर्डे, राजेंद्र पानसरे, राजेंद्र आहिरे, एन टी गाजरे, विवेक पाटील, उन्मेष कुलकर्णी,  योगिता आहेर , वर्षा  डांगरीकर, समीर पटवा, दिलीप वाघ , गोविंद झा, आदिंसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*