मुली, महिलांनी आर्थिक सक्षम व स्वसंरक्षणासाठी आत्मविश्वासू असणे आवश्यक – पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौघुले 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँन्ड अग्रिकल्चरतर्फे लक्षिका मंगल कार्यालय, सिटी सेंटर मॉलसमोर, लव्हाटेनगर, नाशिक येथे आयोजित प्रेरणा २०२० या ६ व्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सेल्फ डिफेन्स (निर्भया) विषयावर प्रशिक्षक सौ. अंजूषा चौघुले व पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौघुले यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र चेंबरच्या महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सौ. सोनल दगडे स्वागतपर भाषणात म्हणाल्या कि, महिलांना उद्योजिका बनविणे, त्यांच्या उत्पादनांना व्यासपीठ देणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मार्केटिंग प्रशिक्षण देणे यासह विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याबरोबरच महिलांचा सर्वागीण विकास कसा होईल यासाठी महिला समिती काम करते. सेल्फ डिफेन्स असणे आज गरजेचे झाले आहे त्यासाठीच आज प्रेरणा प्रदर्शनाच्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स (निर्भया) या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. घरातील पुरुष पाठीशी आहे म्हणून त्याच्यावर अवलंबून राहू नये. शिक्षण महत्वाचे आहे त्याचबरोबर आपली काळजी आपणच घेतली पाहिजे. मुलींनी आणि महिलांनी आर्थिक सक्षम होणे आणि स्वसंरक्षण करण्याची तयारी करणे आवश्यक आहे.सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे. व्हाट्सअँप, फेसबुक, सेल्फी यामागे न लागता त्याचा योग्य वापर करून फायदा करून घेणे गरजेचे असून शिक्षणावर लक्ष देऊन शिक्षण पूर्ण करणे व स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतरच तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. पोलीस नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत पण तुम्ही सक्षम असणे गरजेचे असे पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौघुले म्हणाल्या. प्रशिक्षक अंजूषा चौघुले यांनी मुलींना आणि महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या कि, प्रसंगावधान राखून मुली व महिलांनी अन्याय, अत्याचार करणाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण करणे गरजेचे आहे त्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे टिप्स दिल्या. घाबरून न जाता आत्मविश्वासाने प्रसंगाला कसे सामोरे जायचे, कुणी त्रास देत असेल, पळून नेट असेल त्याचा मुकाबला कसा करायचा. दिवस असो किंवा रात्र स्वतःची काळजी कशी घ्यायची हे सांगितले. 
याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरच्या महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सौ. सोनल दगडे, मुंबईच्या प्रशिक्षक अंजूषा चौघुले व पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौघुले, सौ. दिपा चांगरानी, सौ. वृंदा लवाटे, सौ. योगिनी देशपांडे, सौ. दिपाली बिरारी, डॉ. स्नेहा वीर उपस्थित होत्या.  
पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौघुले यांचा महिला उपसमितीच्या चेअरपर्सनसौ. सोनल दगडे याने स्मृतीचिन्ह व भगवद गीता देऊन सत्कार केला तर मुंबईच्या प्रशिक्षक अंजूषा चौघुले यांच्या सौ. योगिनी देशपांडे यांनीस्मृतीचिन्ह व भगवद गीता देऊन  सत्कार केला. 
नाशिककरांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष श्री. अनिलकुमार लोढा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सौ. सोनल दगडे, व महिला समितीने केले आहे.

Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*