नाशिक मनपा नगरसेवक प्रविण (बंटी ) तिदमे यांना कामगार नेता पुरस्कार जाहीर

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नंबर १ मराठी वृत्त वाहिनी वेध न्युजच्या १८ वा वर्धापन दिन निमित्त वेध गौरव २०१९ – २० कामगार नेता पुरस्कार शिवसेना नगरसेवक प्रविण (बंटी ) तिदमे यांना जाहीर झाला. रविवार १२ जानेवारी श्रीक्षेत्र रामकुंड येथे आयोजित वर्धापनदिन प्रसंगी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे हे एच.ए.एल. कामगार संघटना, भारतीय कामगार सेना, म्युनिसिपल कर्मचारी – कामगार सेना, महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार सेना अश्या विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून गेल्या १७ वर्षांपासून कामगार हिताची कामे करत असल्यानेच मा. श्री. प्रविण (बंटी) तिदमे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्री. प्रविण (बंटी) तिदमे हे म्युनिसिपल कर्मचारी – कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची तर एच.ए.एल. कामगार संघटनेच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत.

Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*