‘निमा’त ‘बौद्धिक संपदा अधिकार’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

दि. २८ जानेवारी २०२० रोजी निमा आयएफसी तर्फे निमा हाऊस, सातपूर येथे दुपारी ४ वाजता जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे हे प्रमुख अतिथी असतील. तर बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ञ सहस्ररश्मी पुंड व पराग खेडकर हे वक्ते लाभले आहेत. ‘बौद्धिक संपदा अधिकारांचे उद्योग व्यवसायातील फायदे’ या विषयावर पराग खेडकर हे मार्गदर्शन करतील तर ‘ बौद्धिक संपदा अधिकार- पैलू व आंतरराष्ट्रीय नियमावली’ या विषयावर सहस्ररश्मी पुंड हे मार्गदर्शन करतील.

सध्याच्या स्पर्धेच्या बाजारपेठेत सरस ठरण्यासाठी व संशोधन व नवनिर्मितीस चालना देत व्यावसायिक वृद्धी साधण्यासाठी बौद्धिक संपदा अधिकार या विषयाची जाण असणे आवश्यक ठरते. त्यासंदर्भात उद्योजक व व्यावसायिकांमध्ये वरील कार्यक्रमाद्वारे जनजागृती निर्माण होण्यास निश्चित मदत होईल. तरी अधिकाधिक उद्योजक व्यावसायिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व नितीन वागस्कर, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, निमा आयएफसी चे समन्वयक विजय लगड यांनी केले आहे. सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.

Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*