निमात महिला दिनानिमित्त ‘सक्षम महिला – सक्षम देश’ या विषयावर पॅनल डिस्कशन चे आयोजन

निमाची महिला उद्योजिका समिती व इनरव्हील क्लब, नाशिक मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त ‘सक्षम महिला – सक्षम देश’ या विषयावर पॅनल डिस्कशन चे आयोजन दि. ६ मार्च २०२० रोजी दुपारी ४ वाजता निमा हाऊस, सातपूर येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई च्या वरिष्ठ संचालिका रूपा नाईक या उपस्थित आहेत. पॅनल डिस्कशन मध्ये पॅनेलिस्ट्स म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या विधी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रोफेसर चारुशीला खैरनार, वित्त तज्ञ सौ. स्वरांजली पिंगळे, मानसोपचारतज्ञ डॉ. हेमंत सोननीस, शिक्षणतज्ञ हेमंत जोशी यांचा सहभाग असणार आहे. निमा इनोवेशन फॅसिलिटेशन सेल व येस बँक हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. कार्यक्रमाचे नियोजन निमा महिला उद्योजिका समितीच्या अध्यक्षा नीलिमा पाटील व इनरव्हील क्लब, नाशिक मिडटाउन च्या चार्टर्ड प्रेसिडेंट सरिता नारंग यांनी केले आहे.

महिला व मुलींनी भावनिकदृष्ट्या, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जागरूक व्हावे तसेच महिला कायद्यांबाबत जागरूक व्हावे यासाठी वरील कार्यक्रम मार्गदर्शक ठरणार असून महिला व मुलींनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून लाभान्वित व्हावे असे आवाहन निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व नितीन वागस्कर, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख, खजिनदार कैलास आहेर, निमा महिला उद्योजिका समितीच्या अध्यक्षा नीलिमा पाटील व इनरव्हील क्लब, नाशिक मिडटाउन च्या अध्यक्षा डॉ. उर्वशी कासारे निकम, चार्टर्ड प्रेसिडेंट सरिता नारंग यांनी केले आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.

Random Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*
*