राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०

“दुपारी १ नंतर चांगला दिवस आहे.”

नक्षत्र – कृतिका

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) स्वतःवर खुश व्हाल. आत्मचिंतन कराल. सुखाची अनुभूती मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. साध्य आणि साधन यातील फरक ओळखा. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संधी येत आहेत. वेळ दवडू नका. महत्वाचे करार पूर्ण करा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) घरातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करा. दानधर्म करा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दीर्घकालीन लाभाची गुंतवणूक करा. नात्यात वाद नकोत. सूचक घटना घडतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आरोग्य सांभाळा. घशाशी संबंधित आजाराकडे दुर्लक्ष नको. संमिश्र दिवस आहे.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या नावावर व्यवसाय करा. घरात वेळ व्यतीत कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) म्हटची कामे सकाळी पूर्ण करा. धनलाभ होतील. कामे मार्गी लागतील.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. नवीन ओळखी होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. गृहकलह टाळा. मातेची काळजी घ्या.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लेखकांना उत्तम यश मिळेल. हातून चांगले काम होईल. आर्थिक लाभ होत आहेत.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) स्पष्ट बोलणे टाळा. शब्द देताना जपून द्या. कुटुंबास वेळ द्या.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *