औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार

औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार; दिवाळीच्या काळात औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न – नाशिकचे पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील

दिवाळी दरम्यान औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा व गस्ती संदर्भात निमात उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत नाशिकचे पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांनी साधला उद्योजकांशी संवाद

औद्योगिक क्षेत्रात गस्ती पथक दरवर्षीप्रमाणे कार्यरत असणार असून उद्योजकांनी देखील दक्षता घेणे आवश्यक आहे. उद्योगांनी कंपनीतील व आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे सुव्यवस्थित असल्याची खात्री करावी. लवकरच औद्योगिक क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून कोणकोणत्या ठिकाणी ते बसवावेत त्यासाठी निमा, आयमा व अन्य औद्योगिक संघटनांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन केले. दिवाळी दरम्यान औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा व गस्ती संदर्भात निमात उद्योजकांसमवेत आयोजित बैठकीत ते उद्योजकांशी संवाद साधत होते. नाशिक शहरात जवळपास १० पोलीस चौक्यांचे स्थापित करणेकामी उद्योजकांनी सीएसआर निधींतर्गत सहकार्य करावे असे देखील आवाहन केले. पोलीस प्रशासनास विविध गुन्ह्यांची उकल करण्यास आलेल्या यशाचीदेखील त्यांनी माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्तांसमवेत, उपायुक्त श्री खरात, निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, कार्यवाह मिलिंद देशपांडे, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, सचिव ललित बुब यांची उपस्थिती होती.
यावेळी निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक केले.
निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी बैठकीची पार्श्वभूमी विशद करत उपस्थित उद्योजकांना आपले प्रश्न व शंका मांडण्याचे आवाहन केले.
पोलीस आयुक्तांनी उपस्थित सुरक्षा एजंसीजच्या प्रतिनिधींशी संवाद साधत प्रबोधन केले
यावेळी उपस्थित औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस विभागासोबत आयोजित होत असलेल्या बैठकांमुळे दिवाळीदरम्यान होत असलेल्या गुन्ह्यांवर नियंत्रण आले असून पोलीस प्रशासनाने दिवाळी दरम्यान भंगार व्यापारावर निर्बंध लावावेत तसेच गस्तीपथकाने गस्तीदरम्यान कंपन्यांबाहेरील सुरक्षारक्षकांच्या हजेरीसंदर्भात खात्री करावी . उद्योकांना धमकाविण्याचे, कामगारांना लुटण्याचे प्रकार घडत असून त्यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यास उत्तर देतांना पोलीस आयुक्तांनी विविध उपाययोजनांची माहिती देत गस्तीदरम्यान क्यूआर कोड प्रणाली वापरली जाणार असल्याचे सांगितले तसेच आपत्कालीन स्थितीत संपर्क क्रमांकाची माहिती दिली.

यावेळी अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव, निमाचे मानद सचिव सुधाकर देशमुख, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र जाधव, सिद्धार्थ पाटील, नीलिमा पाटील, मिलिंद राजपूत, एन. डी ठाकरे, विजय लगड, गौरव धारकर, सदस्य सतीश सैंदाणे एस. एस. विधाते, आयमाचे खजिनदार उन्मेष कुलकर्णी तसेच आयमाचे व लघु उद्योग भारतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.