नाशिक औद्योगिक परिसरातील प्लास्टिक उद्योजकांसाठी निमा-जीआयझेड आयएफसी या निमा व जीआयझेड यांच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिक इंडस्ट्री मीट या कार्यक्रमाचे आयोजन दि. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी २.३० वाजता निमा हाऊस सातपूर येथे करण्यात आले आहे. प्लास्टिक उद्योगासमोरील आव्हाने, प्लास्टिक टाकाऊजन्य पदार्थांवरील करावयाच्या प्रक्रिया, बाजारपेठेतील नवीन संधी व सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, औरंगाबाद या संस्थेमार्फत उपलब्ध असलेल्या सेवा इ. ची माहिती दिली जाणार आहे व प्लास्टिक उद्योजकांशी संवाद साधला जाणार आहे. सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, औरंगाबाद चे संचालक व प्रमुख डॉ. ललित गुलाणी व व्यवस्थापक श्री. प्रवीण बच्छाव हे वक्ते असणार आहेत.
तरी प्लास्टिक उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्षेत्रातील संधींची माहिती घ्यावी असे आवाहन निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर व श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार कैलास आहेर, मानद सचिव किरण पाटील व सुधाकर देशमुख तसेच निमा-जीआयझेड उपक्रमाचे समन्वयक विजय लगड यांनी केले आहे.