पर्यावरण पूरक गणपती- झाडाचा गणपती बाप्पा
आम्ही या वर्षी पर्यावरण पूरक गणरायाची आरास केली. शाडू मातीचा गणपती घरीच तयार करून कुठलेही रंग न देता मांडला. गणपतीची सजावट करताना आम्ही दोन महिन्यापूर्वीच आमच्या घरीच देशी फळझाड रोपवाटिका तयार केली असून त्यात आंबा, सीताफळ, जांभूळ आदि फळ झाडे विकसित करून त्यांचा सजावटी साठी वापर केला आहे. तसेच फुलझाडे यांचा सुद्धा सुशोभीकरणासाठी वापर केला.पूर्णपणे पर्यावरण पूरक गणपती मांडला आहे. आम्ही घरीच गणपतीचे ११ दिवसानंतर विसर्जन करणार आहोत. गणपती विसर्जना नंतर सजावटी साठी वापरलेली झाडे शेतात, सार्वजनिक ठिकाणी रोपण करण्यात येणार आहे. तसेच गणरायाची आरास केल्यानंतर “घरच्या घरी रोपवाटिका आणि घरोघरी रोपवाटिका” “प्रत्येक रविवारी एक तास झाडांसाठी” हा संदेश तयार करून सोशल मिडिया च्या माध्यमातून प्रसारित केला.
श्री.ज्ञानोबा ढगे
पंचवटी,नाशिक
9637747896
ddnyanesht@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *